याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत, अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं.
पुणे, दि. २२ : अमित शाहांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींवर जहरी टीका केली. स्वत:ला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले असा घणाघात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला. तर भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली. आता यावर अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा, खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपने आरोप केलेले डर्टी डझन आज त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असल्याकडे लक्ष वेधत, सुप्रिसा सुळे यांनी अमित शाहांच्या टीकेचा समाचार घेतला. त्याचवेळी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत, अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं.