All News

दारूत होमिओपथी औषध टाकून पिल्याने आठ जणांचा मृत्यू

दारूत होमिओपथी औषध टाकून  पिल्याने आठ जणांचा मृत्यू

बिलासपूर, दि. ६ मे  : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील सिरगिट्टी येथे दारुमध्ये होमियोपॅथी औषध मिसळून पिणे एकाच कुटुंबातील आठ जणांच्या जीवावर बेतले आहे. अन्य पाच जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हे तरुण गेल्या अनेक दिवसांपासून होमियोपॅथी औषध ’ड्रोसेरा 30’ कोरोनावर प्रभावी असल्याचे समजून मोहाच्या दारुसोबत पित होते. दारुसोबत हे औषध प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो, असा त्यांचा गैरसमज होता.


मंगळवारी सायंकाळी तरुणांनी मोहाच्या दारुसोबत होमियोपॅथी औषध घेतले आणि सर्व जण आपापल्या घरी निघून गेले. घरी गेल्यानंतर रात्री तरुणांची तब्येत बिघडली. सर्वांना उलट्या होऊ लागल्या. चार तरुणांचा मृत्यू झाला. यानंतर चौघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, तर पाच तरुणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Advertisement

test 4 MahaExam IBPS test2