All News

कोरोनानंतर आता पांढर्‍या बुरशीचा धोका

कोरोनानंतर आता पांढर्‍या बुरशीचा धोका

  • बुरशीजन्य आजारांचा साथीच्या कायद्यात समावेशाचे निर्देश

मुंबई, दि. २१ मे :  कोरोनाच्या काळात होणार्‍या काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस)ला आपत्ती म्हणून काही राज्यांनी जाहीर केले आहे. या काळ्या बुरशीने अनेकांचे बळी घेतले असून आता नव्याने बिहारमध्ये पांढर्‍या बुरशीचेही रुग्ण आढळले असून त्यामुळे भीती वाढली आहे. दरम्यान, काळी बुरशी, किंवा म्युकरमायकोसिस अशा विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या आजाराचा साथीच्या कायद्यांर्गत समावेश करावा, असे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहेत.

बिहारची राजधानी राजधानी पाटणा येथे पांढर्‍या बुरशीचे (व्हाईट फंगस) चार रुग्ण आढळून आले आहेत. या संक्रमित रुग्णांमध्ये पाटणा येथील एक प्रसिद्ध स्पेशलिस्टदेखील समाविष्ट आहे. पांढरी बुरशी ही काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आहे. पांढरी बुरशी कोरोनाप्रमाणे फुफ्फुसावर हल्ला करत आहे. शरीरातील अन्य भागांवर त्याचे संक्रमण होते. नख, स्किन, पेट, किडनी, मेंदू, गुप्तांगे आणि तोंडात याचा संसर्ग होऊ शकतो. पाटण्यात आढळलेल्या चारही रुग्णांमध्ये पांढरी बुरशी दिसून आली. पीएमसीएचची मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. एस. एन. सिंह यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, की रुग्णांमध्ये कोरोनाप्रमाणे लक्षणे दिसून येत आहेत; मात्र त्यांना कोरोना झालेला नाही. या रुग्णांची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती. चाचणीनंतर समजले, की हे पांढर्‍या बुरशीचे संक्रमण आहे.

दरम्यान, एक दिलासा देणारी बाब म्हणजे अँण्टी फंगल औषध दिल्यानंतर हे चारही रुग्ण आता बरे झाले आहेत.  फुफ्फुसालाही पांढर्‍या बुरशीची लागण होते. फुप्फुसावर हल्ला करत आहे. कठउढ केल्यानंतर असे दिसून आले, की कोरोनाप्रमाणे याचे संक्रमण दिसून येत आहे; मात्र तो कोरोना नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की एचआरसीटीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास पांढरी बुरशी शोधण्यासाठी लक्षणे तपासणे आवश्यक आहे. पांढर्‍या बुरशीचे कारण म्हणजे काळ्या बुरशीसारखे रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांमध्ये याचा धोका जास्त असतो.

’काळ्या बुरशी’ला साथीच्या कायद्यांतर्गत अधिसूचित करून त्यानुसार सर्व प्रकरणांची नोंद करण्याची गरज केंद्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे, काळ्या बुरशीची पुष्टी झालेल्या तसेच संशयित रुग्णांची माहिती आरोग्य मंत्रालयाला दिली जाणार आहे. ’सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांनी काळ्या बुरशीची तपासणी, निदान आणि व्यवस्थापन यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्यांना लिहिलेला पत्रात म्हटले आहे. ’काळ्या बुरशी’त करोना विषाणूनं बाधित होऊन बर्‍या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचे समोर आले.


काळ्या बुरशीने नव्वद जणांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्यात एव्हाना काळ्या बुरशीची तब्बल 1500 प्रकरणे समोर आली आहेत, तर यामुळे जवळपास 90 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तामिळनाडूमध्येही काळ्या बरशीचे नऊ रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये काळ्या बुरशीला सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत नोटिफाय करण्यात आले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam test2