All News

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे तिन्ही पक्षात नसलेली एकवाक्यता : प्रवीण दरेकर

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे तिन्ही पक्षात नसलेली एकवाक्यता : प्रवीण दरेकर

मुंबई, दि. ५ मे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. या निर्णयाला महविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका   विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 


विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले,की  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कायदा बनवून दिलेले मराठा आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार आज सर्वोच्च न्यायालयात पूर्णपणे अपयशी ठरले.  महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, तिन्ही पक्षात नसलेली एकवाक्यता, न्यायालयात बाजू मांडण्यात केलेली हेळसांड, कमालीचा हलगर्जीपणा आणि मराठा आरक्षण कायद्याची बाजू भक्कम करण्याऐवजी केंद्र सरकारवर सतत केलेली टीका, यामुळे मराठा समाजाच्या आयुष्यात महाविकास आघाडी सरकारने अंधार निर्माण केला, याचा मी जाहीर निषेध करतो.

Advertisement

test 4 IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd