All News

भारत-श्रीलंका सामन्यांच्या तारखा घोषित

भारत-श्रीलंका सामन्यांच्या तारखा घोषित

कोलंबो, दि. १३ जुलै : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. या मालिकेला येत्या १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे बीसीसीआयने द्वितीय श्रेणीचा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तर संघाचे उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे.

श्रीलंकेचा दुसरा संघ या सराव शिबिरात थांबला आहे.  इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरवले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डांबुलामध्ये खेळाडूंचा एक नवीन संघ तयार केला होता. परंतु आता डंबुला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या संदुनला कोरोनाची लागण झाली आहे.

भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.


Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS Highclonoid Softec Pvt Ltd