All News

कंगनाची ट्विट ट्विट थांबली, ट्विटरकडून अकाउंट सस्पेंड

कंगनाची ट्विट ट्विट थांबली, ट्विटरकडून अकाउंट  सस्पेंड

मुंबई, दि. ४ मे :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचे एका घटनेवरून कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे.


कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता. त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावदक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारा राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.' याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगानाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कंगनाने मायक्रो-ब्लॅगिंग साईटच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. नियमांच्या विरोधात पोस्ट केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.

Advertisement

IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd test 4