All News

जगणे होतेय अवघड, पेट्रोल-डिझेलनंतर स्वयंपाकाचा गॅस इतक्या रुपयांनी महागला

जगणे होतेय अवघड, पेट्रोल-डिझेलनंतर स्वयंपाकाचा गॅस इतक्या रुपयांनी  महागला

नवी दिल्ली, दि.  १ जुलै : घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 25.50 रुपयांनी महागला आहे. तर कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच लॉकडाउनचा फटका बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड होत असल्याचे दिसत आहे. 

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे  दर बदलतात. यापूर्वी 1 मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. यापूर्वी एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली गेली होती, तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये किंमती वाढविण्यात आल्या. दरम्यान, घरगुती गॅसच्या किमतीत यावर्षी सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

Advertisement

test2 IBPS IBPS MahaExam