All News

मुुंबई महापालिकेला ठेवीवर मिळाले 1600 कोटींचे व्याज

मुुंबई महापालिकेला ठेवीवर  मिळाले 1600 कोटींचे व्याज

मुंबई, दि. 10  जून : मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव निर्माण झाल्यापासून त्यास नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवली आहे. असे असतानाही महापालिकेच्या वेगवेगळ्या बँकांतील ठेवींवर मिळालेल्या 1597 कोटी रुपयांच्या व्याजामुळे एप्रिल, 2021मध्ये ही रक्कम तब्बल 80 हजार 342 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत पालिका समजली जाते, तरीही कोरोनविरोधातील लढाईत महापालिकेवर बराच आर्थिक ताण आला. त्या परिस्थितीतही बँकेतील ठेवींमध्ये झालेली वाढ सुखावणारी आहे. मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनास रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय हाती घेतले आहेत. त्यासाठी निधी कमी पडू नये, म्हणून प्रसंगी मुदत ठेवीदेखील मोडीत काढण्याचा कटू निर्णय घेतला. आत्तापर्यंत कोरोनाविरोधातील संघर्षात महापालिकेने तब्बल 2500 कोटी रुपये खर्च केले आहे. महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवीतील जमा रक्कम एप्रिल, 2021मध्ये 78 हजार 745 कोटीपर्यंत गेली होती. त्यात, एप्रिलअखेरीस एक हजार 597 कोटी रुपयांनी वाढ झाल्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे.

Advertisement

MahaExam test 4 test2 IBPS