All News

निवडणुका संपताच 70 दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

निवडणुका संपताच 70 दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, दि. ४ :  देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल - डिझेल च्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. ७० दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल १५  पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी वाढलं आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने इंधानांच्या  किंमती मोदी सरकारकडून स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. 


२७ फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती या दोन महिन्याच्या काळात वाढल्या असूनही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे साहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होते. पण जशा या निवडणुका संपल्या तसे लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Advertisement

test 4 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd IBPS