All News

राष्ट्रपतींच्या दौर्‍यात दोघांचा बळी

राष्ट्रपतींच्या दौर्‍यात दोघांचा बळी

कानपूर, दि. २६ जून :  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा दौरा दोन जणांच्या जीवावर बेतला आहे. राष्ट्रपतींच्या दौर्‍यात असणार्‍या जवानांच्या ताफ्याखाली एक तीन वर्षांच्या चिमुकलीला चिरडली. दुसर्‍या एका घटनेत व्हीव्हीआयपी मूव्हमेंट सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका कोरोनाबाधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ड्युटीवर असणार्‍या पोलिस आयुक्तांनी संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीने पीडित कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

Advertisement

IBPS MahaExam test2 Highclonoid Softec Pvt Ltd