All News

रेल्वेने मे महिन्यात 114 मेट्रीक टन केली मालवाहतूक; आतापर्यंतची सर्वाधिक

रेल्वेने मे महिन्यात  114 मेट्रीक टन केली मालवाहतूक; आतापर्यंतची सर्वाधिक

नवी दिल्‍ली, दि. १  जून : कोविडचे आव्हान असतानाही भारतीय रेल्वेने मे 2021 मधे मालवाहतुक आणि उत्पन्न या दोन्ही बाबतीत चढता आलेख कायम राखला आहे.युद्धपातळीवर काम करत भारतीय रेल्वेने मे महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतुक केली आहे. मे 2021 मधे मालवाहतुक 114.8 मेट्रीक टन आहे. ती मे 2019 (104.6 मेट्रीक टन)  पेक्षा 9.7% अधिक आहे. 

रेल्वेने 2021मधे महत्वाच्या मालाची वाहतुक केली. यात 54.52 दशलक्ष टन कोळसा, 15.12  दशलक्ष टन लोहखनिज, 5.61 दशलक्ष टन अन्नधान्य, 3.68 दशलक्ष टन खते, 3.18 दशलक्ष टन क्षारयुक्त तेल, 5.36 दशलक्ष टन सिमेंट (क्लिंकर व्यतिरीक्त) आणि  4.2 दशलक्ष टन क्लिंकर यांचा समावेश होता. भारतीय रेल्वेने मे 2021 मधे , मालवाहतुकीतून 11604.94 कोटी रुपये उत्पन्न कमावले. या महिन्यात वाघीणीच्या कार्यवाही वेळेबाबत  26% सुधारणा दिसून आली.  मे 2021 मधे ती  4.81 दिवस नोंदवण्यात आली. मे 2019 मधे ती  6.46 दिवस होती. विशेष म्हणजे  मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर सवलत आणि सूटही दिली आहे. सध्याच्या मार्गावर मालवाहतुक करणाऱ्या गाड्यांचा वेगही वाढला हे नमूद करायला हवे. गेल्या 18 महिन्यात मालवाहतुकीचा वेग दुप्पट झाला आहे. या वेगवाढीमुळी संबंधित घटकांच्या खर्चात बचत होत आहे.

काही विभागात ( चार विभागांपैकी) सरासरी ताशी 50 किलोमीटरहून अधिक वेग नोंदवण्यात आला. भौगोलिक कारणांमुळे काही भागात मालवाहतुक करणाऱ्यां रेल्वे गाड्यांनी चांगला वेग नोंदवला. मे 2019 मधे या गाड्यांनी ताशी 36.19 किलोमीटर वेग नोंदवला होता. त्यातुलनेत मे 2021 मधे 26 टक्के अधिक म्हणजे सरासरी ताशी 45. 6 किलोमीट वेग नोंदवला गेला. भारतीय रेल्वेने कोविड -19 चे आव्हान आपली क्षमता आणि कामगिरी उंचावण्यासाठी संधीत परावर्तीत केले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 MahaExam test 4