All News

कळव्यात दरडी कोसळली, पाच ठार

कळव्यात दरडी कोसळली, पाच ठार

मुंबई, दि. २० जुलै : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. सात जण जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दुर्गा चाळ येथील घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे. पाच जणांना बाहेर काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होत; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली. घरांवर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. चार घरांवर दरड कोसळल्याने ती घरे नेस्ताबूत झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या घटनेनंतर प्रीती यादव (५ वर्ष) अचल यादव (१८ वर्ष) यांना यशस्वीरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर या दुर्घटनेट पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामंध्ये प्रभू सुदाम यादव (४५ वर्षे) विधवतीदेवी प्रभु यादव (४०वर्षे) रविकिसन यादव (१२ वर्ष) सिमरन यादव (१० वर्षे) संध्या यादव (३ वर्ष) यांचा समावेश आहे.
ठाण्यातील कळव्यात घोलाईनगर झोपडपट्टी भागात दुपारी एक वाजता दरड कोसळली. दरड कोसळण्याची घटना घडली तेव्हा शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्या ठिकाणी यादव कुटुंब राहत होते. यादव कुटुंबातील सदस्य दरडीच्या ढिगाराखाली सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू झाले.

Advertisement

test2 Highclonoid Softec Pvt Ltd test 4 MahaExam