All News

एकतर्फी प्रेमातून तरुणीची लूट

एकतर्फी प्रेमातून तरुणीची लूट

पुणे, दि. १० मे : एकतर्फी प्रेमातून मार्केटयार्ड परिसरातील तरुणीला लग्नासाठी मागणी करून त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, दुसर्‍यासोबत लग्न केल्यास आईवडीलांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

याबाबत 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार कुतुबुद्दीन हबीब काचवाला (वय 23, रा. कसबा पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. जून 2016 ते मे 2021 दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काचवाला व तरुणी ओळखीचे आहेत. 2016 मध्ये ते एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. त्यावेळी काचवाला हा तरुणीचा सतत पाठलाग करत होता. त्या वेळीदेखील तिने त्याच्यासोबत संबंध ठेवू शकत नसल्याचे सांगितले होते, तरीही त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. भविष्यात तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल, दुसर्‍या सोबत लग्न केल्यास तुझ्या आईवडीलांना जीवे मारेन,अशी धमकी दिली. तरुणीकडे वेळोवेळी पैशाची मागणी केली. तिच्याकडून रोख चाळीस हजार रुपये, एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेतली. तसेच, तिच्या मागे लागून अश्‍लिल बोलून तिचा विनयभंग केला. तसेच, तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने हा सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

test2 IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd