All News

पावसाने ओढ दिल्यास नाशिकमध्ये पाणी कपात

पावसाने ओढ दिल्यास नाशिकमध्ये पाणी कपात

नाशिक, ता. १३ जुलै : नाशिक शहरासाठी गंगापुर धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. रविवारपर्यंत मुसळधार पाऊस न झाल्यास परिस्थिती लक्षात घेत अाठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पावसाने ओढ दिली तर पुढील आठवड्यापासून बुधवारी शहरात एक दिवस पूर्णपणे पाणी कपात करण्यात येणार आहे. या परिस्थिती माहिती जाणुन घेण्यासाठी महापौर सतिश कुलकर्णी यांनी सोमवार (दि.१२) पाणी पुरवठा विभागाच्याअधिकार्यांसमवेत आढावा बैठक  घेतली.


महापालिका क्षेत्रासाठी गंगापूर, दारणा तसेच मुकणेतून पाणीपुरवठा होताे. अंदाजे २० लाख लाेकसंख्येच्या शहरासाठी सुमारे १४ दशलक्ष घनफूट प्रतिदिन पाण्याचा वापर केला जाताे. दरवर्षी १५ अाॅक्टाेबर ते ३१ जुलैपर्यंतचा कालावधी गृहित धरून पाणी अारक्षण निश्चित केले जाते. त्यानुसार या २९० दिवसांसाठी सुमारे साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी अारक्षण निश्चित करण्यात अाले. यात गंगापूर धरणातून ३८००, दारणातून ४०० तर मुकणेतून १३०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षण मंजूर झाले.

Advertisement

IBPS test 4 Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam