All News

Maratha Reservation : माझ्या जीवितास काही झाल्यास धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील

Maratha Reservation : माझ्या जीवितास काही झाल्यास धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील

मुंबई, दि. ५ मे : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजाला  खूप मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयाचं अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केलं असून जर माझ्या जीवितास काही झालं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील. आम्हाला जे जे धमक्या देतायेत तेच जबाबदार असतील असं गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.


सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस जाहीर केलं आहे. कोरोना व्हायरस असतो त्याप्रमाणे ५० टक्यांवरील असे हे होते. मराठा आरक्षण, ५२ मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांच्या दिल्लीतील बैठका, संजय राऊतांची एंट्री, देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरोधात खुल्या गुणवंतांची आणि संविधानची ही लढाई होती,” असंही त्यांनी म्हटलं आहे.  महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंत जे भीतीपोटी समोर येऊ शकत नव्हते त्यांनी ज्याप्रकारे मला आणि कुटुंबाला समर्थन दिलं, माझ्यासोबत उभे राहिले त्यांना मी शुभेच्छा देतो,असं ते म्हणाले आहेत.सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी मराठा आरक्षणावर स्थगिती आणली तेव्हापासून सगळे आदेश रद्द झाले आहेत. आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन तहसिलदार, फौजदार होता येणार नाही. एसटी, एससी, ओबीसी यांना त्याचा लाभ होणार नाही. ५२ मोर्चाचा स्पष्ट पराभव आहे. 

Advertisement

test 4 IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd