All News

कुरिअरच्या चौकशीनंतर एक लाखांना गंडा

कुरिअरच्या चौकशीनंतर एक लाखांना गंडा

पुणे /नाशिक, दि. ४  जून :  नाशिक येथे केलेले कुरिअर पोहचले, की नाही याची चौकशी करताना सायबर चोरट्यांनी वारजे माळवाडी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीला एक लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी एका नामांकित कुरिअर कंपनीमार्फत नाशिक येथे कुरिअर केले होते. काही दिवस झाल्यानंतर हे कुरिअर पोहचले, की नाही याची चौकशी करण्यासाठी त्यांनी कुरिअर कंपनीत फोन केला. त्यांचा फोन कोणी उचलला नाही. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीचा फोन करू का, असा मेसेज आला. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन केला. त्यांना कुरिअर कोठे आहे, याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये ’एनी डेस्क’ हे अ‍ॅप डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर तक्रारदारांना क्रेडिट कार्डवरून पाच रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने सायबर चोरट्याने या ज्येष्ठ नागरिकाच्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती मिळवली आणि क्रेडिट कार्डाद्वारे लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार समजल्यानंतर तक्रारदारांनी  पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तीने सांगितलेले कोणतेही अ‍ॅप मोबाअलमध्ये डाउनलोड करायला सांगितल्यास करू नये. अ‍ॅप डाउनलोड केल्यास खात्याची माहिती घेऊन सायबर चोरटे पैसे काढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS