All News

मुंबईत लसीकरण ठप्प

मुंबईत लसीकरण ठप्प

मुंबई, दि. ९ एप्रिल :  महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा योग्यरित्या होत नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी लसी उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबवण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक केंद्रांमध्ये लसी उपलब्ध नाहीत. तसेच मुंबईत केवळ एक दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.


मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा शून्यावर आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे लसीकरण थांबवावे लागलं आहे. आज आपल्याकडे 76 हजार ते एक लाख लसींचे डोस येणार असल्याची माहिती मला माध्यमांकडून समजली आहे; परंतु याबाबत काही अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही, असे त्या म्हणाल्या. आपल्याला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. मग ते देशातील, राज्यातील, मुंबईतील कोणतेही असो. लोकसंख्येप्रमाणे लसींचं वाटप झाले पाहिजे. आता लसींचा साठा किती आहे, याची माहिती लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी अधिक गंभीर आणि सक्रिय आहेत; परंतु त्यांच्या हाताखालील लोक मात्र याकडे गांभीर्यांने पाहत नसल्याची टीका पेडणेकर यांनी केली.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd