All News

नाशिक शहरातील २५ टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवावेत

नाशिक शहरातील २५ टक्के बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवावेत

  • मनपा आयुक्त कैलास जाधव यांचे निर्देश

नाशिक, दि. १३  मे :  शहरातील बालरोगतज्ञ यांनी त्यांच्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी करोना रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच २५ टक्के बेड हे राखीव ठेवण्यात यावेत. असे निर्देश नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. मनपातर्फे बुधवारी शहरातील बालरोग तज्ञ आणि आणि विविध हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांची बैठक बोलविण्यात आली होती यावेळी आयुक्त यांनी आढावा घेतला.

 बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, करोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत शेटे, मनपाचे बालरोगतज्ञ डॉ.बाजी, आयएमए संघटनेचे अध्यक्ष हेमंत सोननिस, सचिव कविता गाडेकर, पेडाट्रिक असोसिएशनच्या सचिव रीना राठी यांच्यासह सह्याद्री हॉस्पिटल, व्होकार्ड हॉस्पिटल, सुयोग हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, अशोका हॉस्पिटल, गाडेकर मँटरनेटी होम आदी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, संचालक, सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील बालरोगतज्ञ यांच्या रुग्णालयांमध्ये असणाऱ्या एकूण बेड संख्येच्या २५ टक्के बेड हे करोना बाधित बालरुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाने आरक्षण ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, जर रुग्ण संख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने त्या बेडच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

यावेळी उपस्थित बालरोग तज्ञ यांच्याकडून शहरातील हॉस्पिटलची संख्या, बेड व त्यांच्याकडे उपलब्ध असणारे व्हेंटिलेटर याबाबतची माहिती या बैठकीत घेण्यात आली. याप्रसंगी चर्चेदरम्यान पुढील मुद्दे मांडण्यात आले. त्यात ज्या हॉस्पिटलकडे ५० बेड किंवा त्यापेक्षा जास्त बेडची व्यवस्था आहे. त्यांनी स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट तयार करावेत, मनपाच्या सीबीआरएस सिस्टीमवर वारंवार अपडेट भरून सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी. मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी खाजगी रुग्णालयांना जी मदत अपेक्षित आहे ती त्या प्रमाणात करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सीबीआय सिस्टीम अपडेट करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या. भविष्यातील नियोजन म्हणून लहान बालकांना करोना झाल्यास कोणत्या पद्धतीचे उपचार करावेत, त्यांना कोणते व्हँक्सीन द्यावे किंवा त्याबाबतच्या उपचाराचा प्रोटोकॉल याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Advertisement

IBPS MahaExam test2 Highclonoid Softec Pvt Ltd