All News

महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

गोवा, दि. ६ मे : जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी राज्यसरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केलं आहे दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 


.महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेक मराठी मालिकांचं तसचं रिअ‍ॅलिटी शोचं चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलं.  कलर्स वाहिनी वरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो, 'सूर नवा ध्यास नवा'च्या गोव्या मधील सेटवर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचं दिसत आहे. गोव्यातील मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरण सुरु असतानाच सरदेसाई तेथे आले आणि त्यांनी चित्रीकरणाला विरोध दर्शवला. चित्रीकरणामुळे त्या भागात रुग्ण वाढत असल्याचा त्यांनी  सांगितले 

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd