All News

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी करावे : पटोले

देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस  फडणवीसांनी करावे : पटोले

मुंबई, दि. १५   मे : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह निवडक विरोधी पक्षांच्या अध्यक्षांनी सह्या करुन हे पत्र पाठवले होते. हा पत्र काँग्रेसवर उलटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पत्र लिहिले. दरम्यान, सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

नाना पटोले म्हणाले, की कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण तसेच ४ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा जबाबदार आहे. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभैर झालेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. 70 वर्षांत कधी भारताची झाली नव्हती, एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळे झाली आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सीजन प्लँट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सीजनची गरज १७५० मे. टन आहे. यातील १२०० मे टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे आकडेवारी देत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहारमध्ये किती कोरोना चाचण्या होतात? किती रुग्णांना ऑक्सीजन मिळतो? कोरोनाने भाजपशासित राज्यात किती मृत्यू होत आहेत? याची माहिती फडणवीसांनी भाजपाध्यक्षांना पत्र लिहून मागवावी.


Advertisement

MahaExam IBPS test 4 test2