All News

पुण्याच्या महापौरांनीच खुशाल न्यायालयात जावे

पुण्याच्या महापौरांनीच खुशाल न्यायालयात जावे

  • अजित पवार यांचा सल्ला; टाळेबंदीचा चेंडू मुख्यमंत्र्याच्या कोर्टात


पुणे, दि. ७ मे : राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती. त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक टाळेबंदी लावावी, अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या; मात्र यावर राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी सादर केली, असा आरोप करत पुण्याच्या महापौरांनी केला होता. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही ते म्हणाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौरांनी तातडीने न्यायालयात जावे असे सांगितले. पुण्याच्या टाळेबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगत पवार यांनी टाळेबंदीचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावला आहे. 


पुण्यात शुक्रवारी कोरोना आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ’’पुणे शहराचे आकडे तिथे जात नाही, तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशी सर्व मिळून आकडेवारी जाते. महापौरांना काय वाटते, ते त्यांनी सांगितले. त्यांनी तातडीने न्यायालयात जावे असे मला वाटते. न्यायालयाने काय सांगितले तेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिक वेगवेगळे कारणे सांगत घराबाहेर पडतात, असे पोलसाांचे मत आहे; मात्र आता उच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. कारण नसताना बाहेर फिरतात त्यांच्यावर कारवाई झाली तर फरक पडेल.’’ 


बारामतीत दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती. तिथली भौगोलिकता बेड आरोग्य सुविधा पाहून अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे तिथे टाळेबंदीचा निर्णय घेतला, असे पवार यांनी सांगितले. कोरोना आढावा बैठकीपूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला होता. कोरोना निर्मूलन कामात पुणे शहराने देशात गौरव व्हावा असे आदर्श काम केले. सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट न्यायालयात पुणे शहरात एक लाख रूग्ण आहेत, असे सांगितले. ही आकडेवारी जिल्ह्याची आहे. फक्त पुणे शहराची नाही हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळेच न्यायालयाने कडक टाळेबंदी करण्यास सांगितले, असा दावा मोहोळ यांनी केला. राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी न्यायालयात सादर करत महापालिकेची, पर्यायाने शहराची प्रतिमा खराब करण्याचा प्रकार आहे, असा आरोपदेखील महापौरांनी केला होता.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS test 4