All News

बिबवेवाडीत सपासप वार करून गुंडाचा खून

बिबवेवाडीत सपासप वार करून गुंडाचा खून

पुणे, दि. १५   मे :  शहरात एका बाजूला टाळेबंदी सुरू असताना बिबवेवाडी येथे दोन गटातील अनेक जण एकत्र आले. ध्यरात्रीच्या सुमारास दहा जणांनी मिळून एका गुंडावर सपासप वार करून त्याचा निर्घूण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना मध्यरात्री दीड वाजता बिबवेवाडी पोलिस चौकीसमोरील डॉ. आनंद पंडीधर यांच्या सरोजनी क्लिनिकसमोर घडली.

माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे़  या प्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ संजय पलंगे (वय 21, रा. बालाजीनगर, धनकवडी) याने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावन गवळी, आबा ढावरे, सुनील घाटे, पवन गवळी व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माधव वाघाटे हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. माधव याचा मित्र सुनील खाटपे याने माधवला फोन करून माझे भांडण झाले आहे. मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याचे सांगितले. त्यानुसार माधव व फिर्यादी सिद्धार्थ पलंगे हे दोघे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी चौकीच्या समोर सुनील याची वाट पाहत थांबले होते. या वेळी तेथे सावन गवळी व इतर दहा जण आले. त्यांनी लाकडी बांबू, दगड, लोखंडी रॉडसारख्या हत्याराने व ट्यूबने माधव वाघाटे याच्या तोंडावर व डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळके पळून गेले. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

test2 IBPS IBPS Highclonoid Softec Pvt Ltd