All News

काळाने माझा भाऊ हिरावून घेतला : नाना पटोले

काळाने माझा भाऊ हिरावून घेतला : नाना पटोले

मुंबई, दि. १६  मे :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे.” अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd test2