All News

गरीबांच्या शिक्षणासाठी संस्थेने काम करावे : छगन भुजबळ

गरीबांच्या शिक्षणासाठी संस्थेने काम करावे : छगन भुजबळ

नाशिक, दि.  १ जुलै : सत्यशोधक चळवळीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या 107 वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. संस्था अधिकाधिक उज्‍ज्वल कशी होईल, गरिबांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उदघाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण करुन प्रत्येक स्थळाची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच त्यांनी यावेळी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले व सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी मानले आहे.

Advertisement

test 4 IBPS test2 MahaExam