All News

तोक्ते चक्रीवादळ : रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जण जखमी , 839 घरांचे नुकसान

तोक्ते चक्रीवादळ : रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जण  जखमी , 839 घरांचे  नुकसान

अलिबाग, (जि.रायगड) दि. १७ मे :  “तोक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे.


या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी  9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.


जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.


तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:-

अलिबागमध्ये 22 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 24 मि.मी. असून, 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पेण मधील 1 घराचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 8 मि.मी. असून, 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुरुड तालुक्यातील 5 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 32 मि.मी. इतके आहे. 306 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पनवेल तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 50 मि.मी. इतके असून, 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील 1 घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 व्यक्ती व 1 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 27 मि.मी. आहे. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील 17 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण80 मि.मी. इतके असून, 48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील 91 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 12 मि.मी. इतके असून, 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

माणगाव तालुक्यातील 27 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 17 मि.मी. इतके असून, 291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

रोहा तालुक्यातील 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 19 मि.मी. इतके असून, 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

सुधागड तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 26 मि.मी. इतके असून असून, 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

तळा तालुक्यातील 23 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 21 मि.मी. असून 36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

महाड तालुक्यातील 38 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 23 मि.मी. इतकी असून, 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पोलादपूर तालुक्यातील 96 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 41 मि.मी. इतके असून, 81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

म्हसळा तालुक्यातील 204 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 44 मि.मी. इतके असून, 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील 335 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 48 मि.मी. इतके असून, 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS IBPS