IMG-LOGO
नाशिक शहर

मविप्रमध्ये इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉडर्न मॅनेजमेंट चर्चासत्राचे उद्घाटन; आज समारोप

Thursday, Mar 28
IMG

दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय चर्चासत्र " इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉडर्न मॅनेजमेंट" चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक, दि. २८ : भारतीय ज्ञानव्यवस्थेवर बुधवारी (दि. २७) व गुरुवारी (दि. २८) रोजी दोन दिवसीय ८ वे राष्ट्रीय  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय. एम.आर.टी.) मध्ये  " इंडियन नॉलेज सिस्टिम रेलेव्हस इन मॉडर्न या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, व्यावसायिक डॉ. राहुल फाटे उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या चर्चासत्रासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालाचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.या प्रसंगी डॉ. राहुल यानी भारतीय ज्ञान प्रणाली हि पंधरा हजार वर्ष जुनी असून त्याचा उपयोग सध्याच्या युगात कसा केला जातो हे पटवून दिले. कर (TAX) पद्धती हि कृष्ण युगापासून अमलात आणली गेली असे अर्थशास्त्र सांगितले आहे. राज्य कारभार योग्य रित्या चालविण्यासाठी ८ टक्के कर लावला गेला पाहिजे त्यापेक्षा जास्त कर का लावू नये हे सांगितले. त्याचप्रमाणे ज्ञानाचे परिपूर्ण कथन केले नाही तर त्याचे अज्ञान होते. तसेच शूर्पणखा व सीता या दोघीही कर्तत्वान स्त्रिया होत्या हे पटवून दिले.पहिल्या सत्रामध्ये पुरातत्वशास्त्र सर्वेक्षक रमेश पडवळ यांनी नाशिक जिल्ह्याची वैशिष्ट समजावून सांगितले. नाशिक मध्ये असलेल्या नद्या, परंपरा, मंदिरे, त्यामधील शिलालेख, यांद्वारे पुरातन काळामध्ये असलेली शिक्षण पद्धती दाखविली. सातवाहन काळापासून नासिक ही शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय राजधानी होती व त्यासाठी इंग्लंडमध्ये सात वर्ष त्यावर ती चर्चा चालू होती असे सांगितले.दुसऱ्या सत्रात सकाळचे माजी संपादक तथा सूरतमधील ऑरो विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास देवकर यांनी योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंदांचे भारतीय ज्ञान प्रणाली मधील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृती कशी प्रगत आहे हे पटवून दिले. भारतीय संस्कृती चे परदेशात अनुकरण, अभ्यास केला जातो. श्री.  अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांनी विपरीत परिस्थितीमध्ये ही ज्ञानाच्या क्षेत्रात साहित्य संस्कृती व सभ्यता निर्माण केली भारताच्या पौराणिक कथा कविता यामध्ये ही मानवी संस्कृती दडलेली आहे असे त्यांनी सांगितले. या वेळी श्री. देवकर यांनी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व संचालक मंडळाला योगी अरविंद यांचे द लाइप डिव्हाइन या ग्रंथांचे खंड भेट दिले. तिसरे सत्र यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान व त्याचा व्यवस्थापनामध्ये कसा उपयोग होतो यासाठी प्रा. अशोकराव सोनवणे यांनी मॉडरेटर  म्हणून काम बघितले. स्वामी कंठानंद यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी श्रवण मनात चिंतन व विवेकावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. यानंतर योगाचार्य अशुतोष पवार यांनी योग म्हणजे जीवा शिवाची गाठ असते. ध्यान करून चंचल मनाला आवर घालावा , असे सांगितले. तिसरे वक्ते हरिभक्त परायण डॉक्टर रामकृष्ण ललितकर महाराज यांनी तुकोबाराय यांचे तत्त्वज्ञान वारीला समर्पित जीवन व वारकरी संप्रदाय हा आचार अनुमती समृद्धी संस्कार यावरती चालतो असे सांगितले.चौथे वक्ते संगीतकार श्री संजय गीते यांनी राग यमन व राग खमाज यांची माहिती दिली. संगिताचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो व संगीतामुळे मानवी जीवन कसे समृद्ध  होते याचे विवेचन त्यांनी साग्रसंगीत केले व ऊपस्थितांना गायनमुग्ध केले. भन्ते धम्म रक्षक बुद्धा यांनी बौद्ध धर्मामध्ये शील धर्म व पंचशील यांचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की  एकांतावासामध्ये माणूस स्वतःला कनेक्ट होतो. यानंतर वैद्य विक्रांत जाधव यांनी भारतीय संस्कृती आचार विचार खाद्य संस्कृती व आयुर्वेद शास्त्र याबद्दल आपले विचार मांडले. आज आय एम आर टी मध्ये आठव्या राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

Share: