IMG-LOGO
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 Phase II : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील ८ मतदारसंघासह देशातील ८९ मतदारसंघात मतदान

Friday, Apr 26
IMG

देशातील १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे.

मुंबई, दि. २६ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील  १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य देखील मतपेटीत बंद होईल. महाराष्ट्रात पश्चिम विदर्भातील  बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघातील २०४ उमेदवार मैदानात आहेत.  अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील  यांच्यात तिरंगी लढत आहे. विद्यमान खासदास संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नांदेड मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीच्या वतीने रिंगणात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेच्याच बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागेश आष्टीकर यांना मैदानात उतरवले आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय देशमुख तर महायुतीतर्फे शिवसेनेच्या (शिंदे गट) जयश्री पाटील रिंगणात आहे. वर्ध्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. भाजपतर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत. बुलढाणामध्ये महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.  पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झालं. पहिल्या टप्प्यातील मतदारांची टक्केवारी कमी असल्याने यंदा दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढावं यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.   

Share: