IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Lok Sabha Election 2024 Phase II : महाराष्ट्रात मतदारांची मतदानाकडे पाठ; सरासरी फक्त ७. ४५ टक्के मतदान

Friday, Apr 26
IMG

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

मुंबई, दि. २६ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील  १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातल्या ८ मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी फक्त ७. ४५ टक्के मतदान झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ९.७७  % मतदानाची नोंद झाली आहे. आता पर्यंत ही सर्वाधिक मतदानाची नोंद आहे. अशी आहे मतदानाची लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी  परभणी – ९.७७ टक्केनांदेड – ७.७३ टक्केयवतमाळ वाशिम – ७.२३ टक्केवर्धा- ७.१८ टक्केअकोला – ७.१७ टक्केअमरावती – ६.३६ टक्के

Share: