IMG-LOGO
नाशिक शहर

Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

Saturday, Apr 27
IMG

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते.

मुंबई, दि. २७ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १६,  जळगाव – २०, रावेर – २९, जालना – ३५, औरंगाबाद – ४४, मावळ – ३५, पुणे – ४२, शिरूर – ३५, अहमदनगर – ३६, शिर्डी – २२ आणि बीड लोकसभा मतदारसंघात ५५ असे एकूण ३६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Share: