IMG-LOGO
राष्ट्रीय

आरबीआयची कोटक महिंद्रा बँकेविरोधात मोठी कारवाई

Thursday, Apr 25
IMG

आरबीआयने कोटक बँकेला आयटी यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यास सांगितलं होतं

दिल्ली, दि. २५ : बँकिंग क्षेत्र नियामक भारतीय रिझर्व बँकेने कोटक महिंद्रा बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडण्यावर निर्बंध आणले आहेत. याशिवाय आरबीआयने कोटक बँकेच्या नव्या क्रेडिट कार्ड्स जारी करण्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे.  कोटक बँकेच्या आयटी यंत्रणेत त्रुटी सापडल्याने बँकेच्या मोबाइल आणि ऑनलाइन माध्यमातून नवे ग्राहक जोडता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार,  यापूर्वीच आरबीआयने कोटक बँकेला आयटी यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेवटी आरबीयने मोबाइल आणि ऑनलाइन माध्यमातून ग्राहक जोडण्यावर निर्बंध आणले. यापुढे कोटक महिंद्रा बँकेला नव्या क्रेडिट कार्डांचं वितरण करता येणार नाही, कोटक महिंद्रा बँक आपल्या सद्यस्थितीतील ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड आहेत, त्यांना मात्र सर्व सेवा पूरवल्या जातील. असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

Share: