IMG-LOGO
राष्ट्रीय

Ramnavmi : इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्याचे, त्यागाचे फळ : नरेंद्र मोदी

Wednesday, Apr 17
IMG

ही पहिली रामनवमी आहे, आमचे रामलला अयोध्येच्या भव्यदिव्य राम मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत.

दिल्ली, दि. १७ : अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यानंतर येथे रामनवमीचा उत्सव पहिल्यांदाच साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेली एक्स पोस्टही पहिली रामनवमी आहे, आमचे रामलला अयोध्येच्या भव्यदिव्य राम मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. आज रामनवमीच्या या उत्सवामुळे अयोध्यत आनंदाचे वातावरण आहे. पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये रामनवमी साजरी करण्याचे भाग्य लाभले आहे. देशवासीयांच्या इतक्या वर्षांच्या कठोर तपश्चर्येचे आणि त्यागाचे हे फळ आहे". भगवान श्रीराम भारतीयांच्या मनामनात-अंत:करणामध्ये विराजमान आहेत. भव्य राम मंदिरातील हा पहिला रामनवमी सोहळा म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या असंख्य रामभक्तांचे, संत-महात्मांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्याची संधी आहे. असे या पोस्ट मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Share: