IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Sangli loksabha 2024 : बंडखोर विशाल पाटील उमेदवरीवर ठाम; अर्ज ठेवला कायम, चिन्हही मिळाले

Tuesday, Apr 23
IMG

अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं.

सांगली, दि. २३ : महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा आपला निर्णय सोमवारी कायम ठेवला. त्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यात विशाल पाटलांनाही निवडणूक चिन्ह देण्यात आलंय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे ‘लिफाफा’ या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह मिळालं आहे.महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक लढवीत असताना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी परत न घेतल्यामुळे आघाडीत नाराजी असल्याचं समोर आलं आहे. नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते येत्या २५ एप्रिल रोजी आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहणार आहेत.

Share: