IMG-LOGO
लोकसभा २०२४

Satara Loksabha : महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी

Tuesday, Apr 16
IMG

२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत उदयराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिक्रिटावर निवडून आले होते.

दिल्ली, दि. १६ : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने अखेर साताऱ्यामधून आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. उदयनराजे भोसले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत उदयराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिक्रिटावर निवडून आले होते. परंतु, काही वेळेनंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला आणि खासदारकीचा राजीनामा दिला. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने उदयनराजे भोसले यांना मैदानात उतरविले. तर, शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरविले. या निवडणुकीत पाटील यांनी भोसले यांचा पराभव केला. उदयनराजे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. ३ एप्रिल २०२० रोजी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. २ एप्रिल २०२६ पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. काही आठवड्यांपूर्वी उमेदवारीसंदर्भात संभ्रम असल्याने स्वत: उदयनराजे तीन दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. श्रीनिवास पाटील यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिल्यानंतर सातारा मतदारसंघातून कोण लढणार हा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. उदयनराजेंच्या उमेदवारीची दाट शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती त्यामुळे तगडा उमेदवार देण्याचं आवाहन शरद पवार गटासमोर होतं. त्यानुसार पवार गटाने शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे. 

Share: