IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Loksabha 2024 : नाशिकच्या जागेचा सस्पेन्स आणखी वाढला ; छगन भुजबळ यांची माघार

Friday, Apr 19
IMG

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं.

नाशिक, दि. १९ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अद्याप उमेदवारीबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नसल्याने  छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुक न लढवण्याची निर्णय जाहीर केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिनही पक्षांनी दावा केला आहे हे विशेष आता याठिकाणी कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. दिल्लीत अमित शहांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं. दिल्लीत आपल्या नावावर अमित शहांनीच शिक्कामोर्तब केलं होतं, पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशिर झाल्याचंही भुजबळ म्हणाले.

Share: