IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election 2024 : मोदींच्या कार्यकाळात जागतिक पातळीवर भारताचा सन्मान : योगी आदित्यनाथ

Tuesday, Apr 09
IMG

एनडीए गटबंधनातील उमेदवारांना विजयी करणे आवश्यक असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

वर्धा, दि. ९ : उद्यापासून भारतीय नववर्ष सुरु होत आहे. भारत स्वतंत्र्याचा लढा उभारणाऱ्या गांधीजींची वर्धा कर्मभूमी आहे. उत्तरप्रदेशात 80 जागा आहेत. सर्व देशात मोदीच येणार याकरता जनता आश्वस्त आहे. पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात भारताल नवीन उंची दिली. गरीब कल्याणचे काम केले.  मात्र विरोधकांकडे ना नेता आहे ना निती आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.जागतिक पातळीवर भारताचा सन्मान वाढला आहे. भारताच्या पासपोर्टचे महत्त्व वाढले आहे. मात्र 2014 पूर्वी असे चित्र नव्हते. सध्या भारताचा सीमावर्ती भाग सुरक्षित झाला असल्याचा दावा देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. यापूर्वी भारतामध्ये शेजारील देशातून मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरला जात होता. मात्र, सरकार डोळे बंद करून त्याकडे पाहत होते, असा आरोप देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्र विकसित होण्यासाठी नेता, धोरण यासोबतच नियत देखील आवश्यक असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मात्र सध्या विरोधी पक्षाची स्थिती ही ना नेता, ना धोरण आणि ना नियम अशी असल्याचा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि 'अबकी बार, ४०० पार' चा नारा पूर्ण एनडीए गटबंधनातील उमेदवारांना विजयी करणे आवश्यक असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. 

Share: