IMG-LOGO
साहित्य संमेलन

साहित्य संमेलनाच्या जनसंपर्क समितीच्या बैठकीत सूक्ष्म नियोजनाबाबत चर्चा

Friday, Feb 12
IMG

इतर भाषिक वृत्तपत्रासाठी मराठीचे हिंदी- इंग्रजीत भाषांतर करू शकणाऱ्यांनी या समितीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक, दि. १२ फेब्रुवारी : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजन ( जनसंपर्क ) समितीची पहिली बैठक आज झाली. संमेलनाच्या संदर्भातील विविध बातम्या  सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या वाचक, प्रेक्षकांपर्यंत नेटकेपणाने,योग्य स्वरूपात पोहचाव्यात यादृष्टीने नियोजन करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे. बैठकीत प्रारंभी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर,मुकुंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर समितीचे प्रमुख अभिजित चांदे यांनी समितीचे कार्य नियोजन याबद्दल तसेच येणाऱ्या पत्रकारांसाठीच्या सुविधा, व्यवस्था आणि सदस्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. पत्रकारांसाठी इंटरनेट सुविधा,भोजन,निवास याशिवाय चार्जिंग सारख्या छोट्या पण महत्वाच्या मुद्यांचाही विचार करण्यात येणार आहे. इतर भाषिक वृत्तपत्रा साठी मराठीचे हिंदी- इंग्रजीत भाषांतर करू शकणाऱ्यांनी या समितीत सहभागी व्हावे असे आवाहन  करण्यात आले आहे. या बैठकीस समितीच्या उपप्रमुख सुप्रिया देवघरे,अतुल जोशी तसेच सुभाष पाटील,दिलीप सावेकर,राधिका गोडबोले,पद्माकर देशपांडे,विवेक देशपांडे,गोरख भालेराव,दिगंबर काकड आदी उपस्थित होते.

Share: