IMG-LOGO
साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक

Thursday, Feb 11
IMG

संपूर्ण संमेलन सूत्रबद्धतेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयंसेवकांच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

नाशिक, दि. ११ फेब्रुवारी : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू झाली असून स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज नगरी, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कार्यालयात संमेलनाच्या स्वयंसेवक  समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यात प्रामुख्याने संपूर्ण संमेलन सूत्रबद्धतेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयंसेवकांच्या  नियोजनाबाबत चर्चा झाली. त्याच बरोबर साहित्यापासून दूर असलेल्या वर्गाला या प्रक्रियेशी मोठ्या प्रमाणात कसे जोडून घेता येईल आणि स्वयंसेवेबरोबर युवा पिढीवर जास्तीत जास्त चांगले वाङ्मयीन संस्कार कसे होतील यावरही चर्चा झाली. यावेळी जास्तीत जास्त युवा वर्गाने स्वयंसेवक म्हणून नोंदणी  करून घेण्यासाठी पुढे येणाचे आवाहन स्वयंसेवक समिती तर्फे करण्यात आले आहे.या बैठकीला लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आणि संमेलनाच्या स्वयंसेवक समितीचे पालक रमेश देशमुख तसेच संमेलनाचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यालयीन प्रमुख  दिलीप साळवेकर, कार्यवाह सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी  दीपक पाटील, श्रध्दा कापडणे, वेदांशु पाटील, शुभम शेंडे, भूषण काळे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी  व नोंदणीसाठी  श्रद्धा कापडणे  9657452720 ,  वेदांशु पाटील  914 509 5757  यांच्याशी  संपर्क साधावा.

Share: