IMG-LOGO
क्रीडा

CSK VS GT : गुजरातचा ६३ धावांनी पराभव; चेन्नईचा घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय

Wednesday, Mar 27
IMG

चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना ६ विकेट गमावत २०६ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरातच टायटन्सचे फलंदाज या सामन्यात अयशस्वी ठरले.

चेन्नई, दि. २७ : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल IPL 2024 ची सातवी मॅच पार पडली. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव झाला. चेन्नईच्या टीमने घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय मिळवला आहे.चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना ६ विकेट गमावत २०६ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरातच टायटन्सचे फलंदाज या सामन्यात अयशस्वी ठरले. साई सुदर्शन वगळता एकाही फलंदाजाला ३० चा आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. गुजरातचे फलंदाज फेल झाल्याने संघाला तब्बल ६३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलला स्लो ओव्हर रेट प्रकरणात दोषी आढळल्याने १२ लाखांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड एम.ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कालच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचसाठी आकारण्यात आला. सध्या शुभमन गिलला फक्त दंड ठोठावण्यात आला आहे, परंतु आगामी सामन्यांमध्ये पुन्हा याच कारणासाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही येऊ शकते.  

Share: