IMG-LOGO
क्रीडा

TATA IPL 2024 : थरारक सामन्यात हैदराबादचा ३१ धावांनी विजय; मुंबईचा लाजिरवाणा पराभव

Thursday, Mar 28
IMG

वनडे वर्ल्डकप फायनलचा हिरो ट्रॅविस हेडने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात देखील धडाकेबाज फलंदाजी केली.

हैदराबाद, दि. २८ : आयपीएलच्या १७  व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसला नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ रन्सने पराभव केला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर करून मुंबई इंडियन्सला विजयासाठी २७८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करण्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यामुळे हैदराबादचा 31 धावांनी विजय झाला.वनडे वर्ल्डकप फायनलचा हिरो ट्रॅविस हेडने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात देखील धडाकेबाज फलंदाजी केली. ट्रॅविस हेडने 18 चेडूत अर्धशतक पूर्ण कर हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. तसेच हैदराबादला ६ षटकात १ बाद ८१ धावा करत हैदराबादच्या इतिहातालीत पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावा करून दिल्या. ट्रॅविस हेडने हैदराबादकडून सर्वात वेगवान अर्धशतक (१८ चेंडू) ठोकण्याला अवघे २२ मिनिटेच झाली होती. तोच अभिषेक शर्माने १६  चेंडूत अर्धशतक ठोकत हा विक्रम मोडला.

Share: