IMG-LOGO
क्रीडा

RCB vs LSG : लखनौचा २८ धावांनी विजय, बंगळुरूचा हंगामात तिसरा पराभव

Wednesday, Apr 03
IMG

लखनौच्या मयांक यादवने (Mayank Yadav) पुन्हा या सामन्यात सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

लखनौ, दि. ३ : आयपीएल २०२४ मधील १५वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनौने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला.आरसीबीविरुद्ध सामन्यात डी कॉकने १४४.५४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. डी कॉकने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्याने ५६ चेंडूत ८१ धावा पूर्ण केल्या. तर, वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर निकोलस पूरन २१ चेंडूत नाबाद ४० धावांवर नाबाद राहिला. पूरनच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर एलएसजीने २० षटकांत ५ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून मॅक्सवेलने चार षटकांत दोन विकेट्स घेतल्या आणि २३ धावा दिल्या. या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरनच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने बंगळुरूसमोर १८१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ १५३ धावांवर गारद झाला. लखनौच्या मयांक यादवने पुन्हा या सामन्यात सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पंजाबविरुद्ध गेल्या सामन्यातही त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या.

Share: