IMG-LOGO
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव

Saturday, Mar 23
IMG

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली.

बेंगळुरू, दि. २३ : चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरूवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला आहे. शिवम दुबेच्या इम्पॅक्ट पाडणाऱ्या तुफान खेळीसह चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला आहे. १९ व्या षटकात २ चौकार आणि एका षटकारासह शिवम दुबेने चेन्नईला सहज विजय मिळवून दिला. जडेजा आणि दुबेची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली मुस्तफिझूर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. त्याचवेळी या स्टार अष्टपैलूने १७ चेंडूत २५ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही फलंदाज अपराजित राहिले. आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने २ तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.अनुज रावतने सामन्याचा रोख बदलत २५ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटाकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. पहिला डाव संपल्याने त्याचे अर्धशतक हुकले पण संघासाठी निर्णायक क्षणी महत्त्वाची इनिंग तो खेळला. तर दिनेश कार्तिकसुध्दा मोक्याच्या वेळी पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचक ठरला, त्याने २६ चेंडूक २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. 

Share: