IMG-LOGO
क्रीडा

हैद्राबादच्या क्लासेनची अयशस्वी फाईट; कोलकाताने चार धावांनी सामना जिंकला

Sunday, Mar 24
IMG

हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली. शेवटचे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार खेचला.

कोलकाता, दि. २४ : कोलकाता संघाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर ४ धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला.  कोलकाता संघ १४व्या षटकांत सहा बाद ११९ आणि २०व्या षटकाअखेर सात बाद २०८ या सहा षटकांत आंद्रे रसेल नावाचे वादळ आले. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादची चार बाद १४५ अशी अवस्था झाली होती; पण अखेरच्या षटकांत १३ धावांच्या आव्हानासमोर त्यांना आठच धावा करता आल्या. त्यामुळे कोलकाताने चार धावांनी सामना जिंकला.संघ बॅकफुटवर असताना रमनदीपने अवघड अशा परिस्थितीत तुफान फलंदाजी केली. कर्णधार कमिंन्सच्या एका षटकात त्याने सिक्स आणि चौकार मारले. त्यानंतर मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीवर ९० मीटर लांब षटकार मारला. मग कमिंन्सने चेंडू मार्को यानसेनच्या हातात दिला. त्याचा चेंडू देखील रमनदीपने सीमारेषेच्या बाहेर घालवला. तर शाहबाज अहमदच्या चेंडूवर षटकार मारला. ६ चेंडूत १३ धावांची गरज असताना हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली. शेवटचे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेत शाहबाजकडे स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज श्रेयस अय्यरकडून झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या यान्सनने एक धाव घेत क्लासेनला स्ट्राईक दिली. २ चेंडू ५ धावांची आवश्यकता असताना क्लासेनकडे स्ट्राईक होती त्याने चेंडू हवेत लगावला खरा पण सुयश शर्मा त्याचा झेल टिपला आणि त्याला तंबूत धाडले. यानंतर हर्षित राणाने सहाव्या चेंडूवर एकही धाव न दिल्याने कोलकाताने ४ धावांनी हा अटीतटीचा सामना जिंकला.

Share: