IMG-LOGO
शेती

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

Friday, Oct 23
IMG

दिवाळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हटलं आहे. फळ पीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 'दिवाळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हटलं आहे. फळ पीक नुकसानग्रस्तांसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत केली जाणार असून रस्ते आणि पुलांसाठी २ हजार ६३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसंच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.

Share: