IMG-LOGO
महाराष्ट्र

शिल्पकार जयदीप आपटे याचा जामीन अर्ज नामंजूर

Tuesday, Oct 01
IMG

मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.

सावंतवाडी, दि. १ : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा दुर्घटनाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याचा न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यापूर्वी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याचाही जामीन अर्ज नामंजूर केला होता. आपल्याला जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी नामंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना काळजी घेतली पाहिजे होती, ती काळजी घेतली नाही, असा सविस्तर युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या कामी सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. 

Share: