दिनकर पाटील यांनी याआधीही विधानसभा निवडणूक तसेच लोकसभा निवडणुकीसाठीही उमेदवारीची तयारी केली होती.
नाशिक, दि. २३ : आमदार म्हणून दहा वर्षात सीमा हिरे यांचं एकही ठोस काम नाही. संभामांडप आणि खेळणे बसवणे हे त्याचं काम, खेळणं बसवून खेळ करणे हेच काम त्यांनी केले, असा आरोप दिनकर पाटील यांनी केला. पाटील यांनी बंडाचे संकेत देत मंगळवारी सातपूर येथील एल. डी. पाटील शाळेत निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.दिनकर पाटील यांनी याआधीही विधानसभा निवडणूक तसेच लोकसभा निवडणुकीसाठीही उमेदवारीची तयारी केली होती. त्यावेळीही त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर ते शांत राहिले होते. यावेळी नाशिक पश्चिम मतदार संघातून उमेदवारीसाठी पुन्हा त्यांनी तयारी सुरु केली असताना पक्षाने आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्याने पाटील हे नाराज झाले आहेत.लोकसभेला हेमंत गोडसे निवडून येणार नाहीत हे सांगितले होते. मला संधी न देता पुन्हा गोडसेंना तिकीट दिले. गोडसेंचा पराभव झाला अन् एक जागा गेली. माझ्या सोबत सर्व जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आहे, असं दिनकर पाटील यांनी सांगितलं. मला जर गर्दी करायला सांगितलं असत तर मी नाशिकचे संभाजी स्टेडियम भरवले असते. पक्षाला हा कार्यक्रम घेताना २० कोटी खर्च करावे लागले असते. महिला या ३०० रुपये घेतल्या शिवाय आल्या नसत्या, पुरुष दारू प्यायला शिवाय आले नसते, असं देखील दिनकर पाटील म्हणाले. सगळ्यांचे पैसे घ्या आणि मतदार मलाच करा, असं आवाहन दिनकर पाटील यांनी केलं. माझ्या सोबत अनेक पक्षांचे लोक आहेत, कोण आहेत ते मी सांगणार नाही. मला रोजगार संधी उपलब्ध करून द्यायचे आहे, मोठी इंडस्ट्री आणायची आहे. छोटे काम माझे नगरसेवक करतील. मी लवकरच तुम्हाला सांगेल अर्ज दाखल केव्हा करायचं आहे. मी तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे. सगळ्यांनी कामाला लागा आता थांबायचे नाही. मला आता पक्ष सांगेल मुख्यमंत्री करतो तरी मी आता थंबणार नाही आता पंतप्रधान केले तरी माघार नाही.