नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले
नांदेड, दि. २२ : नांदेडमध्ये सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, ‘नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली ५ किलोमीटर नोंदवण्यात आली.