IMG-LOGO
महाराष्ट्र

निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब; उद्या पक्षप्रवेश

Tuesday, Oct 22
IMG

निलेश राणे जवळपास वीस वर्षांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हाती घेणार आहेत.

मुंबई, दि. २२ : विधानसभेच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटासाठी सोडला जाणार आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आमदार वैभव नाईक यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार नव्हता. त्यामुळे निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्याचे नियोजन महायुतीने केले आहे. खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.राणे यांचा बुधवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणे अपेक्षित आहे. निलेश राणे जवळपास वीस वर्षांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हाती घेणार आहेत. उध्दव ठाकरे याच्याशी झालेल्या मतभेदांमुळे नारायण राणे आणि त्यांची मुले आणि समर्थक आमदारांनी शिवसेनेशी फारकत घेत काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नंतर कांग्रेस सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले होते. आता कुडाळ मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निलेश राणे निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल होणार आहेत. 2019 मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी मला लहान भावासारखं सांभाळलंय. मी उद्या दुपारी 4 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहे,” असं निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. “उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. उद्या (२३ ऑक्टोबर) ४  वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेशाची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून आम्हाला 27 हजारांचं मताधिक्य मिळालं. 90 टक्के ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, कृषी सोसायटीवर आमची सत्ता आहे. त्यासह लोकसभेलाही आमचा खासदार निवडून आला आहे. महायुतीत आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या. विधानसभाही आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

Share: