तुमचा व शेतकऱ्यांचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नसल्याचा आरोप केला.
दिल्ली, दि. २६ : एमएसपीबाबत तीन प्रमुख उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून आपण एक समिती गठित केली आहे. एमएसपी प्रदान करणे आणि त्यासंबंधीची प्रणाली पारदर्शक करणे हे आपलं पहिलं उद्दीष्ट आहे. तर शेतमालाच्या किंमतीसाठी अधिक स्वायत्तता देणे हे दुसरं उद्दीष्ट आहे. कृषी वितरण प्रणालीसाठी सूचना मिळवणं हे या समितीसमोरचं तिसरं उद्दीष्ट आहे. समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी सरकारला प्रश्न विचारला की ते शेतकऱ्यांना एमएसपी कधी देणार? त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. परंतु शेतकरी हे आमच्यासाठी ईश्वरासमान आहेत. शेतकऱ्यांची सेवा करणं हे आमच्यासाठी पूजा करण्यासारखं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची ईश्वरासमान सेवा करतात.” चौहान यांनी यावेळी एमएसपीसाठी गठित केलेल्या समितीचा उल्लेख केला. यावर रामजी लाल म्हणाले, “तुम्ही केवळ शेतकऱ्यांना ईश्वर म्हणताय, परंतु तुमचा व शेतकऱ्यांचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नसल्याचा आरोप केला.