IMG-LOGO
नाशिक शहर

बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेत प्रवेश

Sunday, Oct 27
IMG

नाशिक पूर्व मधून माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी हातातून घड्याळ काढत शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक : नाशिक पूर्व मधून माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी हातातून घड्याळ काढत शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब सानप यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शिवसेना प्रवेशाने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट कापल्यानंतर बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.भाजपकडून असलेले ढिकले आणि सानप यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. सरतेशेवटी राहुल ढिकलेच पैलवान ठरल्याने सानप यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळे प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच सानप समर्थकांना जोरदार झटका बसला आहे. निवडणुक प्रचाराच्या धामधुमीत खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब सानप यांची बेहत घेतली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यामुळे आताच शिवसेना प्रवेश त्या चर्चेचा सार असावा का असा प्रश्नही सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Share: