IMG-LOGO
महाराष्ट्र

अजित पवार यांच्याविना पवार कुटुंबियांची दिवाळी

Sunday, Nov 03
IMG

काही महिन्यांपुर्वी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि पक्षात फूट पडली.

बारामती, दि. ३ : पवार कुटुंबियांचा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात एकत्रितरित्या साजरा केला जातो असतो. पक्षात आणि नात्यात फूट पडल्यानंतर दिवाळीचा पाडवा हा स्वतंत्र साजरा करण्यात आला. आज भाऊबीज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय साजरी झालीय.खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भगिनींसोबत आज आपल्या निवासस्थानी हा सण साजरा केला.दरवर्षी भाऊबीजेनिमित्त पवार कुटुंब एकत्रित येताना दिसून येतात, काटेवाडीच्या निवासस्थानी भाऊबीजेचा हा कार्यक्रम होतो. काही महिन्यांपुर्वी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि पक्षात फूट पडली, त्यानंतर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले होते. अशातच बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुलाला युगेंद्र पवारांना शरद पवारांनी तिकिट दिलं आहे. बारामतीत अजित पवारविरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. 

Share: